समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यापासून मुक्ती

स्वच्छतेसाठी महापालिकेने नेमले कंत्राटदार

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यापासून मुक्ती स्वच्छतेसाठी महापालिकेने नेमले कंत्राटदार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरील अस्वच्छतेमुळे देशभरातून येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. अशा समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्याचा निर्णय महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. यासाठी कंत्राटदार नेमण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला एच/पश्चिम विभागातील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली जाणार आहे.

वांद्रेमधील एच/पश्चिम विभागातील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्र किनाऱ्यावर जमा होणाऱ्या कचऱ्याने डोकेदुःखी वाढवली आहे. येथील किनाऱ्यांवर गाळ, माती, डेब्रिजमिश्रीत कचरा आदी नियमितपणे निष्कासित करावा लागतो. समुद्र किनाऱ्यावर जमा होणाऱ्या कचऱ्यामध्ये मुख्यत्वे संमित म्हणजेच गाळ, माती, डेब्रिजमिश्रीत कचरा यांचे प्रमाण असून सदर कचरा मनुष्यबळ, उत्खनन आणि भारपूरक यंत्र व डम्पर वाहनांद्वारे जमा करून पुढील विल्हेवाट लावण्याकरिता क्षेपणभूमी येथे वाहून नेला जातो. या कामासाठी यापूर्वीदेखील दोन वर्षांच्या कालावधीकरिता कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. सदर कंत्राट कालावधी आता संपुष्टात आला आहे.

किनाऱ्यावरील स्वच्छतेच्या कामासाठी महापालिकेकडून ई-निविदा मागविण्यात आल्या. निविदेस प्रतिसाद म्हणून पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या. लघुत्तम प्रतिसादात्मक निविदाकार मे. रनुजा देव कॉर्पोरेशन यांचा ठरला असून त्यांचा देकार कार्यालयीन अंदाजपत्रकाच्या तुलनेत १८.९४ टक्क्यांनी कमी आढळला आहे. त्यांनी अंदाजित खर्च प्रतिदिन १५.२८९ रुपये या दराने ७३० दिवसाकरिता एकूण १,११,६०,९७० इतका नोंदवला आहे.

पर्यटनवाढीला चालना
एच/पश्चिम विभागातील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्र किनाऱ्याची ७३० दिवसांकरिता स्वच्छता केली जाणार आहे. त्याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. यामुळे मुंबईतील दोन समुद्रकिनाऱ्यांची घाणीपासून मुक्तता होईल. यामुळे किनाऱ्याची दुर्गंधीपासून मुक्तता तर होईलच शिवाय पर्यटन वाढण्यासदेखील मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com