धावत्या बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू

धावत्या बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू

Published on

मुंबई, ता. १८ : धावत्या बेस्ट बसमध्ये आज एका प्रवाशाचा मृत्यू झाला. प्रदीप सावंत (वय ५४) असे मृत प्रवाशाचे नाव असून ते मजास डेपोच्या दिशेने जाण्यासाठी बसने प्रवास करत होते. मंगळवारी दुपारी १३.४५ वाजता मार्ग क्रमांक ५४५ची बस मजास डेपोकडे जात होती. त्यादरम्यान १३.४५ वाजता टागोरनगर जंक्शनजवळ प्रदीप सावंत अचानक बसमध्येच बेशुद्ध पडले. सहप्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी बस चालकाच्या मदतीने त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांना त्याच बसने ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मृत घोषित केले. या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.