‘जे.जे’तील तीन वरिष्ठ डॉक्टर दोषी

‘जे.जे’तील तीन वरिष्ठ डॉक्टर दोषी

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : जेजे रुग्णालयाच्या वैद्यकीय चाचणीतील अनियमिततेच्या प्रकरणी चौकशी समितीने जे. जे. रुग्णालयाच्या माजी अधिष्ठात्यांसह तीन डॉक्टरांवर आरोप करण्यात आले आहेत. यासोबतच आर्थिक अनियमिततेबाबत ऑडिट आणि क्लिनिकल चाचण्यांबाबत संस्था स्तरावर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची शिफारसही चौकशी समितीने केली आहे. नुकताच जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांना हा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे.

कोविड घोटाळ्यात ईडीच्या तपासात जे.जे. रुग्णालयाच्या औषध विभागाचे डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव समोर आले. याप्रकरणी डॉ. गुप्ता यांची प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर औषधशास्त्र विभागांतर्गत एका खासगी संस्थेमार्फत क्लिनिकल ट्रायल रूम चालवली जात असल्याची माहिती समोर आली. रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, या अंतिम अहवालात समितीने तीन डॉक्टरांना क्लिनिकल ट्रायलमधील त्यांच्या भूमिकेसाठी दोषी ठरवले आहे. अल्पदरात रुग्णालयाची खोली उपलब्ध करून दिल्याबद्दल जे.जे रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे माजी अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांना या केसमध्ये समन्वयकाच्या भूमिकेत हलगर्जीपणा केल्याबद्दल आणि डॉ. औषध विभागाचे माजी प्रमुख डॉ. गमरे यांच्यावर पार्श्व लाइफ सायन्स या खासगी संस्थेला क्लिनिकल चाचण्यांसाठी जे.जे. रुग्णालयात जागा उपलब्ध करून देण्यात रस दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या समितीने आपल्या अहवालात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही उघड केले आहे.

----
७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई
आतापर्यंत डॉ. आकाश खोब्रागडे यांनी १६ लाख रुपये आणि डॉ. तायडे यांनी २६ लाख रुपये शासनाला परत केले आहेत. मात्र, अजूनही जवळपास अंदाजित ७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
.....
कारवाईकडे लक्ष-
डॉ. हेमंत गुप्ता यांची जे.जे. रुग्णालयातून हकालपट्टी केल्यानंतर आता या तिन्ही डॉक्टरांवर कारवाईचे अधिकार हे फक्त नियुक्त केलेल्या संबंधित अधिकारी आणि शासनाकडे आहेत. यासंबंधी पत्रव्यवहार दोन दिवसांत केला जाणार आहे, असे जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.