केईएम रुग्णालयाचे आहारगृह चकाचक

केईएम रुग्णालयाचे आहारगृह चकाचक

Published on

केईएम रुग्णालयाचे आहारगृह चकाचक
रुग्णांना मिळणार गरमागरम जेवण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असणाऱ्या केईएममध्ये आता रुग्णांना चांगला आणि सकस आहार देण्याकडे लक्ष दिले जात आहे. स्वच्छतेचे सर्व निकष पाळून आता रुग्णांना चांगला आहार दिला जाणार आहे. केईएम रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञांनी भायखळ्याच्या इस्‍कॉन संस्थेची भेट घेतली. या संस्‍थेमध्ये जेवणाची सोय केली जाते, तिथली स्वच्छता, गरम आणि ताजे जेवण ठेवण्याच्या पद्धती त्यांनी अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना सांगितल्या. त्यानुसार अधिष्ठात्यांनी त्याच पद्धतीची सुविधा केईएमच्या आहारगृहात तयार केली आहे.
आहारगृहात तयार होणारे जेवण रुग्णालयाच्या जवळपास ५० वॉर्डमधील रुग्णांना दिले जाते; मात्र स्वच्छतेत जेवण मिळणे हा मोठा प्रश्न होता. याच प्रश्नावर मार्ग काढत रुग्णालय प्रशासनाने सुसज्ज आणि अत्याधुनिक असे किचन तयार करण्यात आले आहे.

थर्मल कंटेनरद्वारे गरमागरम जेवण
पूर्वी ॲल्युमिनियमच्या डब्यांमधून जेवण रुग्णांना दिले जात होते; पण जेवण थंड व्हायचे. या सर्व गोष्टी लक्षात घेत आता थर्मल कंटेनरद्वारे गरमागरम जेवण रुग्णांना दिले जाते.

केईएम रुग्णांसाठी दररोज एका वेळी ५० किलो तांदळाचा भात, २८ किलो डाळीचे वरण आणि ५५ किलो भाजी आणि तब्बल ११०० ते १२०० चपात्या केल्या जातात.
- श्रुती शेट्टीगर, आहारतज्ज्ञ

केईएम रुग्णालयाच्या आहारगृहात भात शिजवण्याची नवीन मशीन, नारळ फोडण्यासाठीची मशीन, तीन नव्या चिमण्या, भाजी कापण्याचे मशीन, ५० वॉर्डसाठी थर्मल कंटेनर पुरवले गेले आहेत. प्रत्येक वॉर्डसाठी चार थर्मल कंटेनरची सोय केली गेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छतेत काम व्हावे, यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
- डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्‍णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.