अण्णा भाऊ साठेंच्या सहा खंडांची ‘मेजवानी’

अण्णा भाऊ साठेंच्या सहा खंडांची ‘मेजवानी’
Published on

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या तब्बल ३० कादंबऱ्या एकूण सहा खंडांच्या रूपात वाचकांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी ‘लोकशाहीर चरित्र साधने समिती’ने खंडाची छपाई पूर्ण केली असून, याच साहित्यावरील ऑडिओ-व्हिडीओ व्हीज्युअल्स बुकही तयार केले आहे. अण्णा भाऊ साठे यांचे हे सर्व साहित्य उद्या (ता. १) जयंतीच्या निमित्ताने प्रकाशित व्हावे, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकशाहीर चरित्र साधने समितीने ३० कादंबऱ्यांचे प्रत्येकी पाच कादंबरीप्रमाणे सहा खंड तयार झाले असून त्याची छपाई कोल्हापूर, नागपूर आणि पुण्यातील शासकीय मुद्रणालयात पूर्ण झाली आहे. प्रत्येक खंडाची किंमत सर्वसामान्य वाचकांना परवडेल यासाठी केवळ ६० रूपये ठेवली असून, प्रत्येक कादंबरी सुमारे १२ रुपयांना मिळणार आहे. अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य वाचकांना उपलब्ध व्हावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे समितीच्या मागील वर्षभरात पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयात सुमारे २५ हून अधिक बैठका झाल्या.
अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपातही ऐकता/पाहता येणार आहेत. याचे काम ‘पुस्तक मार्केट डॉट कॉम’मार्फत मिलिंद कसबे यांनी केले. त्याला समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केल्याची माहिती समितीचे सदस्य डॉ. शरद गायकवाड यांनी दिली.

अप्रकाशित साहित्य अजून दूरच
लोकशाहीर चरित्र साधने समितीकडून सध्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या ३० कादंबऱ्या आणि त्यांचे सहा खंड प्रकाशित केले जात आहेत; मात्र अजूनही अप्रकाशित साहित्य, त्यांच्यावरील विविध चळवळीतील प्रसिद्ध न झालेल्या आठवणी, त्याचे दस्तावेजांलक अजूनही समितीने काम सुरू केले नाही; मात्र येत्या काळात त्यावरही काम केले जाणार असल्याचे समितीच्या सदस्यांकडून सांगण्यात आले.

शाहिरी वाङमय वर्षभरात
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतीपैकी शाहिरी वाङमय, गण, छक्कड, लोकनाट्य तसेच प्रवास वर्णनापैकी ‘माझा रशियाचा प्रवास’ आदी अनेक साहित्य समितीकडून प्रकाशित होणे बाकी आहे. येत्या वर्षाभरात प्रकाशनाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास समितीचे सदस्य डॉ. गायकवाड यांनी व्यक्त केला.

कार्यालयाची वणवण कायम
अण्णा भाऊ साठे समितीची स्थापना होऊन नऊ वर्षांचा कालावधी उलटत असला तरी अजूनही समितीला हक्काचे कार्यालय मिळू शकले नाही. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मार्च महिन्यात हे कार्यालय लवकरच मिळेल, अशी घोषणा केली होती; मात्र ती घोषणा हवेतच विरली आहे. अद्यापही समितीला कार्यालय नसल्याने सर्व कारभार पुण्यातील संचालक कार्यालयात उसनवारीने सुरू असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra
solapur city police
Anna Hazare
Vijay's TVK Eyes Majority as 10 AIADMK Legislators May Switch Sides
Marathi News Esakal
www.esakal.com