स्कोडा रॅपिड मॅट
स्कोडा रॅपिड मॅटSkoda Rapid Matte

Auto News: सर्वांत सुरक्षित मोटार असा लौकिक मिळवलेल्या स्कोडा ऑटो इंडियाचे २५०वे ग्राहक टचपॉइंट

मुंबई, ता. २४ ः सर्वांत सुरक्षित मोटार असा लौकिक मिळवलेल्या स्कोडा ऑटो इंडियाने भारतातील आपले विक्रीजाळे वाढवताना २५०वे ग्राहक टचपॉइंट उघडण्याचा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या कुशक व स्लाविया या मोटारींनी भारतात चांगला व्यवसाय केला आहे, असे स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक पीटर सोलक म्हणाले. स्कोडाने कर्नाटकच्या गुलबर्गा येथे अडीचशेवे ग्राहक टच पॉइंट उघडले आहे.

पुढील वर्षअखेरीस त्यांचे ३५० ग्राहक टचपॉइंट होतील, अशी अपेक्षा आहे. कंपनीने आपल्या गाड्यांसाठी चार वर्षे किंवा दहा हजार किलोमीटरपर्यंत वॉरंटी दिली आहे. तसेच आठ वर्षे किंवा दीड लाख किलोमीटरचे मेंटेनन्स पॅकेजही दिले आहे. कुशक आणि स्लाविया या दोन्ही मोटारींना प्रौढ आणि अल्पवयीन प्रवाशांसाठी ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम (ग्लोबल एनसीएपी) मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com