योगीराज बागूल यांच्या पुस्तकांचे उद्या प्रकाशन

योगीराज बागूल यांच्या पुस्तकांचे उद्या प्रकाशन

Published on

मुंबई, ता. ३ : ज्येष्ठ साहित्यिक योगीराज बागूल यांच्या ‘दगडी वाडा’ या ग्रामीण मराठी कादंबरीचे आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी भाग-१’ या संशोधनात्मक ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी आरसीएफ वसाहत येथील गंगाधर देशमुख हॉल येथे सायंकाळी ५.३० वाजता चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि आरसीएफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुडगेरीकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जेष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे आणि ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाचे लेखक व उद्योगपती प्रफुल्ल वानखेडे आपले विचार व्यक्त करणार आहेत. प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘पेरणी’ प्रकाशन आणि वितरण या प्रकाशन संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून ‘पेरणी’ प्रकाशनचे निमंत्रक निलेश बागूल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.