दिवाळीच्या सुट्टयानंतर मुंबई आणि परिसरात शाळा पुन्हा गजबजल्या

दिवाळीच्या सुट्टयानंतर मुंबई आणि परिसरात शाळा  पुन्हा गजबजल्या
Published on

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर शाळा पुन्‍हा गजबजल्या
मुंबई, ता. २८ : दिवाळीच्या तब्बल दोन आठवड्यांच्या सुट्ट्यांनंतर मुंबईसह उपनगरांतील शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी पुन्हा गजबजबली. दुसऱ्या सत्रातील शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना थेट अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा त्यांचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
इंग्रजी आणि केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांची दिवाळी सुट्टी मागील आठवड्यातच संपली आहे; मात्र शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्‍यारीत येणाऱ्या तसेच महापालिका शिक्षण विभागाच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची दिवाळी सुट्टी संपल्यानंतर त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. यात मुंबईतील हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू आदी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे.

दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये दुसरे सत्र सुरू होते. त्यानुसार अभ्यासक्रम, पुस्तके याचे नियोजन शिक्षकांकडून यापूर्वीच करण्यात आले असल्याने त्याचीही सुरुवात करण्यात आली आहे.
- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी, पालिका

उपक्रमांचे आयोजन
मुंबईतील शाळांतील मुलांच्या आरोग्यासंदर्भात अनेक उपक्रम सुरू आहेत. शिवाय गुणवत्तेसोबत शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असून दिवाळीनंतरच्या या दुसऱ्या सत्रातही अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com