

मुंबई, ता. २८ : राज्यातील मुस्लिम समाजाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शिक्षण, नोकरीसोबत सामाजिक आणि आर्थिक विकासातही हा समाज खूप मागे राहिला असून त्यांच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणासाठी आझाद विचार मंचने राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले. मुस्लिम समाजाच्या शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नांवर मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांनी आज भेट घेतली. त्या वेळी संबंधित प्रश्नावर निवेदन सादर करत चर्चा करण्यात आली. भारतीय संविधान देशाला समर्पित होऊन ७४ वर्षे झाली, पण मुस्लिम समाजाला न्याय व समानता देताना भेदभाव केला जात असल्याचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. राज्यात मुस्लिम समाजाचे सरकारी व खासगी नोकरीमध्ये प्रतिनिधित्व कमी होत आहे, त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. यासाठी गोपाल सिंग आयोग, सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोग आणि डॉ. मेहमूदुर्रहमान समितीच्या शिफारशींचा उल्लेख करून त्याची अंमलबजावणी करावी, तसेच १५ कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी, बार्टी-महाज्योतीप्रमाणे मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च सेंटर ट्रेनिंग सेंटरची स्थापना करावी, मुस्लिमांना शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती द्यावी, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या वेळी मौलाना आझाद विचार मंचसह विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यात हसीब नदाफ, ऐनूल अत्तार, अजीज पठाण, डॉ. दानिश लांबे, फैजुला खान, अजमल खान, मुज्जमील खान, शकील सिद्दिकी, खलील आदींचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.