Marathi Language
Marathi Languagesakal

Marathi Language : मराठीच्या अभिजात दर्जासाठी आग्रही भूमिका

मराठी भाषा आणि तिचे प्राचीन महत्त्व लक्षात घेता‍ तिला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी राज्यातील प्रत्येक मराठी भाषाप्रेमी आग्रही आहेत. मागील काही वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे हा विषय प्रलंबित आहे.

मुंबई: मराठी भाषा आणि तिचे प्राचीन महत्त्व लक्षात घेता‍ तिला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी राज्यातील प्रत्येक मराठी भाषाप्रेमी आग्रही आहेत. मागील काही वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडे हा विषय प्रलंबित आहे. हा प्रश्‍न मार्गी लागावा आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी राज्यातील बहुतांश स्थानिक राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरमान्यात हा विषय आग्रहाने समोर आणत त्याला स्थान दिले आहे.

दुसरीकडे काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीयस्तरावरील पक्ष असल्याने त्यांचे जाहीरनामे हे राष्ट्रीय विषयावरील आहेत. मात्र, त्यांच्या अजेंड्यात हा विषय नसला तरी त्यांचाही आग्रह असल्याचे दिसून येते. राज्यातील स्थानिक राजकीय विषय आणि एकमेकांच्या विरोधात असलेल्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षांनी मराठीच्या अभिजात दर्जाच्या विषयाला प्राधान्यक्रम दिला असल्याने याचे मराठी साहित्य विश्वात मोठे स्वागत होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या ‘शपथनामा’ या जाहीरनाम्यात महाराष्ट्राच्या हितासाठीच्या विषयात मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार, अशी वचनबद्धता स्पष्ट करण्यात आली आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आपला मराठी बाणा जपत अभिजात दर्जाला मोठे प्राधान्य दिले आहे. केंद्र आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असूनही केवळ महाराष्ट्र आणि मराठीवरच्या आकसामुळे मराठी माणसाची ही न्याय मागणी मंजूर होत नाही. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वचनबद्ध असल्याचे पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसनेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. ते आपल्या जाहीरमाम्यात महाराष्ट्राची मातृभाषा मराठी गौरवशाली आणि प्रतिभाशाली इतिहास लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात ज्ञानेश्वरी या मानवतावादी ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेला उंच स्तरावर पोहचवले आहे. हा मराठी भाषेचा आणि शैलीचा एक अभिजात ठेवा आहे. याचा आम्हाला नितांत आदर आहे, अभिमान आहे. आमच्या मराठी या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत प्रयत्नशील असून तो मिळवणे हा मराठी मनाचा आणि मराठी जणांचा अधिकार व हक्क असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला जाहीरनामा अद्याप जाहीर केला नसला तरी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी त्यांचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे सुरू आहे. त्यांच्या कार्यकाळात हा पाठपुरावा अधिक व्हावा, यासाठी मराठी भाषा विकासमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशानंतर अभिजात दर्जा लवकर मिळावा, यासाठी पाठपुरावा समितीही गठित केली असून यासाठी शिंदे यांची शिवसेनाही आग्रही असल्याचे दिसून येते.

ही अत्यंत चांगली बाब
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, स्थानिक राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात हा विषय आणला ही अत्यंत चांगली बाब आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आमच्या समितीने अकॅडमिक स्वरूपाचे काम केले होते. आता यासाठी सामाजिक, राजकीय पक्षांनी आग्रही भूमिका घ्यायला हवी. तूर्तास स्थानिक पक्षांनी घेतल्याने ही एक चांगली गोष्ट आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पाठारे यांनी व्यक्त केले.

मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे तसेच महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे आम्ही सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून मराठी भाषेशी संबंधित अभिजात दर्जा देण्यासह अनेक मागण्यांच्या पूर्तीसाठी जाहीरनाम्यात अभिवचने मागितली होती. जे देणार नाहीत अशांना मतदान न करण्याचे आवाहनदेखील केले होते. काही पक्षांनी काही प्रमाणात त्याची दखल घेतली याचा आनंद आहे. - डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रमुख संयोजक, मराठीच्या व्यापक हितासाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com