‘उत्तर पश्चिम’साठी कीर्तिकर आज अर्ज भरणार

‘उत्तर पश्चिम’साठी कीर्तिकर आज अर्ज भरणार

‘उत्तर पश्चिम’साठी कीर्तिकर आज अर्ज भरणार
उद्या वायकर; दोन्ही दिवशी शक्तिप्रदर्शन

मुंबई, ता. १ : मुंबईतील उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे गुरुवारी (ता. २) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर भाजप-शिंदे गटाच्या युतीचे उमेदवार‍ रवींद्र वायकर शुक्रवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्हीही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले जाणार असून यात महाविकास आघाडी आणि दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेसह भाजपचे पदाधिकारी यात मोठ्या प्रमाणात सामील होणार आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मागील तीन आठवड्यांपूर्वीच आपला उमेदवार जाहीर केला होता; मात्र भाजप-शिंदेच्या युतीत उमेदवार निश्चित होत नव्हता. मागील दोन दिवसांपूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेने जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढला असून प्रत्येक उमेदवारांकडून विधानसभानिहाय प्रचारफेऱ्या आणि भेटीगाठी यावर भर देण्यात आला आहे.
या लोकसभा मतदारसंघात एके काळी एकाच पक्षात असलेले निष्ठावान म्हणून ओळख असलेले शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतून उभे आहेत.
...
ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती असणार
महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे आपला नामांकन अर्ज २ मे रोजी सकाळी ११ वाजता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे पूर्व येथे दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेना नेते व आमदार अॅड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार विलास पोतनीस, आमदार ऋतुजा लटके, यासोबत राष्ट्रवादी, समाजवादी, आप पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रवींद्र वायकर हे ३ मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com