संजय पांडे यांची निवडणुकीतून माघार

संजय पांडे यांची निवडणुकीतून माघार

मुंबई, ता.१ः माजी पोलिस सहासंचालक संजय पांडे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. सर्व हितचिंतक, मित्र, सहकारी व कुटुंबीय यांनी व्यक्त केलेली मते आणि सद्य परिस्थितीचा पूर्ण विचार करून आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे पांडे यांनी सांगितले. संजय पांडे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी ही त्यांनी सुरू केली. २००४ पासून निवडणूक लढवण्याचा विचार करत होते. २००९ मध्ये ‘बसपा’ने तर २०१४ मध्ये ‘आप’ पक्षाने उमेदवारी देऊ केली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी काही कारणास्तव निवडणुक लढवली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com