दोषींना निर्दोष मुक्त करेपर्यंत लढा सुरूच

दोषींना निर्दोष मुक्त करेपर्यंत लढा सुरूच

दोषींना निर्दोष मुक्त करेपर्यंत लढा सुरूच
दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर हिंदू संघटनांची प्रतिक्रिया
मुंबई, ता. १० : दाभोलकर प्रकरणाचा एकूणच तपास भरकटत गेला असल्याने या प्रकरणात ज्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली; त्यांना निर्दोष सिद्ध करेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया सनातन संस्थेसह हिंदू जनजागृती या संघटनांकडून आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्था ही हिंदू आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला; तर याच प्रकरणात हिंदू संघटनांना आतंकवादी ठरविण्याचा आणि डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक करून या प्रकरणाचा मास्टरमाईंड ठरविण्याचा प्रयत्नही विफल झाला. काँग्रेसच्या कार्यकाळात काही हिंदू संघटनांना आतंकवादी ठरविण्याचा प्रयत्न करून दाभोलकर प्रकरणात दहशतवादी कायदा लावला. मात्र आता न्यायालयानेच तो या प्रकरणात गैरलागू असल्याचे स्पष्ट केल्याने या प्रकरणाचा सर्व तपासच भरकटत असल्याचेही दिसून आल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी सांगितले. न्यायालयाने दाभोलकर प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा आम्हाला मान्य नाही. मात्र, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातनचे विक्रम भावे, हिंदू विधीज्ञ परिषदेचे ॲड. संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता केली, त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शिवाय या प्रकरणातील हिंदू संघटनांच्या सर्वांची निर्दोष मुक्तता होईपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात दाभोलकर परिवारानेच तपास यंत्रणेवर दबाव आणल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com