पूर्व प्राथमिकसाठी जूनपासून नवीन अभ्यासक्रम

पूर्व प्राथमिकसाठी जूनपासून नवीन अभ्यासक्रम

मुंबई, ता. १३ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी पूर्व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तयार असून जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात पूर्व प्राथमिकच्या बालवाटिका १,२,३ साठी नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. यातील अभ्यासक्रम हा विविध प्रकारच्या साहित्य, खेळ आदींवर आधारित असेल. हा अभ्यासक्रम आणि त्यासंदर्भातील पुस्तके आदी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे.

बालवाटिकेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. त्यानुसार बालभारतीकडे यासाठीचे साहित्य तयार केले जात आहे. एनईपीतील बदलानुसार आता पूर्व प्राथमिकची विभागणी बालवाटिका १,२,३ अशी करण्यात आली आहे. यासाठीचा अभ्यासक्रम, त्याची पुस्तके ही बोलीभाषेतून असतील तर अभ्यासासोबतच संगीत, कला आणि कार्यानुभव मैदानी आणि वर्गातील खेळ. क्षेत्र भेटी, प्रकल्पाधारित अध्ययन, जोडी आणि गट संभाषण, तंत्रज्ञान आधारित अध्ययन, निसर्ग सहली, बाल मेळावे त्यासोबतच सण, उत्सव, विशेष दिन, समारंभ आदींचा अभ्यासक्रमात समावेश असणार आहे. यासोबतच अध्ययनात पंचपदीचा स्वीकार करण्यात आला आहे. गृहभाषा आणि बोलीभाषेतून शिक्षणावर, तसेच खेळाधारित शिक्षण या संकल्पनेवरही अधिक फोकस ठेवण्यात आला आहे.
---
पहिली-दुसरीची पुस्तके पुढील वर्षी
दरम्यान, पहिली आणि दुसरीची पुस्तके पुढील वर्षी लागू होण्याची शक्यता आहे. त्यात पहिली व दुसरीसाठी भाषा (मराठी, इंग्रजी), गणित, कार्यशिक्षण, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण हे विषय आहेत. भाषा व गणित विषयांत परिसर अभ्यास असेल. या नव्या अभ्यासक्रमात घोकंपट्टीऐवजी चिकित्सक आणि विश्लेषणात्मक विचारांवर भर देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com