

दहावीचा निकाल २७ मे रोजी
शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई, ता. २१ : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी, २७ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. यासाठीची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दहावीच्या निकालासंदर्भातील बहुतांश तयारीही बारावीच्या निकालासोबत पूर्ण झाली आहे. यामुळे सोमवारी, २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. या निकालासंदर्भातील घोषणा आणि माहितीही लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा यंदा मार्च महिन्यात घेतली होती. यंदा या परीक्षेचे पेपर तपासणी आदी कामे वेळेत पूर्ण करण्यात आल्याने हा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याऐवजी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लावला जाणार असल्याची तयारी मंडळाकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २१) शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निकालाची तारीख जाहीर केली असल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.