आदिवासी आश्रमशाळांनी गाठले दहावीत ९7. 90 टक्केंचे शिखर

आदिवासी आश्रमशाळांनी गाठले दहावीत ९7. 90 टक्केंचे शिखर

आदिवासी आश्रमशाळांनी गाठले दहावीत ९७.९० टक्क्यांचे शिखर
नाशिक विभागात ९८.२५ टक्के; तर ठाणे विभागाचा ९७.९२ टक्के निकाल
मुंबई, ता. २ ः राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात राज्य आदिवासी विकास विभागांतर्गत चालवण्यात येत असलेल्या शासकीय आश्रमशाळांनी दहावीत तब्बल ९७.९० टक्के निकालाचे शिखर गाठले आहे; तर दुसरीकडे अनुदानि‍त तत्त्वावर चालवण्यात येत असलेल्या आश्रमशाळांचा दहावीचा निकाल हा ९६.०८ टक्के इतका लागला आहे.
यंदा शासकीय आश्रमशाळेच्या निकालात मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या सोयी-सुविधा, विविध प्रकारचे मार्गदर्शन आणि शिक्षकांनी केलेले नियोजन आदिवासी विद्यार्थ्यांच्या निकालासाठी फायद्याचे ठरल्याचे आदिवासी विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यात अनुदानित शाळांचा निकाल कमी असला, तरी त्यातही काही प्रमाणात सुधारणा होण्याची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले.
राज्यात असलेल्या दहावीच्या परीक्षेला नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील शासकीय आश्रमशाळेतील एकूण १९ हजार २१० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ८०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३९७ आहे. यात सर्वाधिक निकाल हा नाशिक विभागाचा लागला असून विभागातील ९८.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या विभागातून ७,७८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले; तर सर्वात कमी निकाल अमरावती विभागाचा लागला आहे. या विभागातून ३ हजार ३४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३ हजार २५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९७.१९ इतकी आहे; तर ठाणे विभागाचा निकाल ९७.९२ टक्के लागला असून एकूण ५ हजार ६६८ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून परीक्षा दिलेल्या एकूण २ हजार ४०७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ३५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ९७.६७ इतकी आहे. या निकालात मुलांपैक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून एकूण ९८.६१ टक्के मुली; तर ९७.०४ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.


नागपूर विभागाचा कमी निकाल
शासकीय आश्रमशाळांच्या तुलनेत अनुदानित आश्रमशाळांचा निकाल कमी लागला असून यात राज्यभरातून १९ हजार २०७ जण परीक्षेला बसले हेाते, त्यापैकी १८ हजार ४५४ विद्यार्थी उत्तीर्ण; तर ७५४ अनुत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.०८ टक्के इतका आहे. यात सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४.६८ टक्के; तर सर्वाधिक निकाल नाशिक विभागाचा ९७.२२ टक्के इतका लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com