स्वच्छ पाण्यासाठी ‘आरओ’चा आधार

स्वच्छ पाण्यासाठी ‘आरओ’चा आधार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पाण्याला अनेकदा जीवनाचे टॉनिक म्हटले जाते. त्यामधील घटक मानवी जीवनात खूप महत्त्वाचे आहेत; मात्र मुंबईत ३८ टक्के मुंबईकर आजही स्वच्छ पाण्यासाठी आरओचा वापर करत आहेत. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
‘लोकल सर्कल’ या खासगी संस्थेने पाण्याच्या शुद्धतेबाबत मुंबईसह देशभरात सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात मुंबईतील ३,६२१ लोकांनी सहभाग घेतला आहे. सर्वेक्षणादरम्यान या लोकांना पाण्याची शुद्धता आणि ते शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाला १,८७१ लोकांनी आपली प्रतिक्रिया दिली. यापैकी ३८ टक्के लोकांनी पाणी शुद्ध करण्यासाठी आरओ सिस्टिमचा वापर केल्याचे सांगितले; तर ३२ टक्के लोकांनी पुरवठा केलेले पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी योग्य बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात वॉटर प्युरिफायर लावले आहेत. ५ टक्के लोकांनी पाणी उकळून वापरतात. ७ टक्के लोक बाटलीबंद पाणी विकत घेतात.
------------------------------------------
पाण्याच्या दर्जाची टक्केवारी
२९ टक्के मुंबईकरांनी त्यांच्या घरांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा खराब म्हटले आहे; तर २६ टक्के लोकांनी पाण्याची गुणवत्ता सरासरी असल्याचे सांगितले आहे. घराला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा पूर्णपणे स्वच्छ असल्याचे ८ टक्के लोकांनी; तर २० टक्के लोकांनी पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com