सायकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार

सायकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार

सायकल प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार
रवींद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचा उपक्रम

मुंबई, ता. २ : मुंबई विद्यापीठाचे दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र व शारीरिक शिक्षण विभाग यांच्यासमवेत केंद्र शासनाच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयाचे महाराष्ट्र व गोव्याचे नेहरू युवा केंद्र व स्मार्ट कम्युट फाऊंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने आज (ता. ३) जागतिक सायकल दिनानिमित्त ''पेडल अप मुंबई'' सायकल रॅली आयोजित करण्यात आली. या सायकल रॅलीत ६०० पेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी झाले होते.
‘सायकल चालवा शहर वाचवा’या थीमवर आधारित ''पेडल अप मुंबई'' ही सायकल रॅली मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझमधील विद्यानगरी येथील क्रीडा संकुलामधून सकाळी सुरू होऊन बांद्रा कुर्ला संकुलातील सोफीटेल हॉटेल येथे समाप्त झाली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी विद्यापीठात ''सायकल प्रशिक्षण अभ्यासक्रम'' सुरू करण्याबाबत घोषणा केली. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आरखड्यानुसार असणार असून लवकरच सर्व विद्याशाखांमधील विविध अभ्यासक्रमामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे.
मुंबईतील स्मार्ट कम्युट फाऊंडेशन ही संस्था आरोग्यदायी वाहतुकीचे माध्यम म्हणून सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या कार्यक्रमाला गोदरेज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष नादिर गोदरेज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर नेक्सस मोबिलीटीचे सह-संस्थापक विनोद मित्तल, पाशा पटेल, प्रा. शिवराम गर्जे, डॉ. नंदकिशोर मोतेवार, प्रकाश मनुरे, मुंबईची पहिली सायकल मेयर फिरोजा दादन, डॉ. विश्‍वनाथ अय्यर, प्रा. वासंती कधीरावन व सीडीओईचे संचालक डॉ. संतोष राठोड हे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com