जूनमध्‍ये १८ वेळा 
हाजीअली दर्गा बंद

जूनमध्‍ये १८ वेळा हाजीअली दर्गा बंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : जूनमध्ये समुद्रात १८ वेळा भरती येणार आहे. या कालावधीत मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्यामुळे हाजीअली दर्गा भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय हाजीअली दर्गा ट्रस्टने घेतला आहे.
हाजीअली ट्रस्टने जूनमधील भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३ जून ते २८ जूनदरम्यान भरतीच्या एक तास आधी आणि नंतर दोन तास असे तीन तास प्रवेश बंद राहणार आहे. हाजीअली दर्गा हा समुद्रात असून भरतीच्या वेळेत या रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी दर्ग्यामधील प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
.......................
हाजीअली दर्ग्यावर सर्वधर्मीय लोक येतात. यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. मात्र, पावसाळ्यात भरतीमुळे समुद्राला उधाण आलेले असते. यादरम्यान सुरक्षात्मक उपाय म्हणून काहीवेळ दर्ग्यातील प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- महंमद अहमद ताहेर, प्रशासकीय अधिकारी, हाजीअली ट्रस्ट
.......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com