अकरावी प्रवेशासाठी मुबलक जागा

अकरावी प्रवेशासाठी मुबलक जागा

अकरावी प्रवेशासाठी मुबलक जागा
नवीन २४ महाविद्यालये, २० तुकड्यांची भर; १५ हजारांहून अधिक नवीन जागा
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई महानगर क्षेत्रात यंदाच्या शैक्षणिक वर्षात २४ नवीन महाविद्यालये आणि तब्बल २० हून अधिक तुकड्यांना मान्यता मिळाली आहे. त्‍यामुळे नवीन महाविद्यालयांमध्ये ७ हजार ९२० आणि २० हून अधिक तुकड्यांच्या माध्यमातून ७ हजार २०० जागा अशा एकूण १५ हजारांहून अधिक जागा वाढणार आहेत. त्‍यामुळे अकरावी प्रवेशासाठी मुबलक जागा उपलब्ध होणार आहेत.
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्रात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांमधील कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश होतो. मागील वर्षी २ हजार ३८५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३ लाख ८९ हजार ६७५ जागा उपलब्ध होत्या. यंदा नवीन २४ महाविद्यालये आणि २० हून अधिक तुकड्यांची भर पडल्याने उपलब्ध जागांची संख्या ही ३ लाख १० हजारांहून अधिक होणार असल्याने प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, अशी माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.
वाढलेल्या जागांमध्ये मुंबई शहरांपेक्षा उपनगरांत नवीन महाविद्यालये सुरू होत असून ही सर्व स्वयंअर्थसहाय्य‍ तत्त्वावरील आहेत; तर काही तुकड्या या अल्पसंख्याक आणि मुंबईतील नामांकित महाविद्यालयांतील आहेत. नवीन महाविद्यालयांमध्ये रायगड जिल्ह्यात केवळ १, तर सर्वाधिक महाविद्यालये ही ठाणे जिह्यात १३ इतकी आहेत. त्यात सर्वाधिक ४ हजार ६८० अधिकच्या जागा उपलब्ध होणार असल्याने ठाण्यातून मुंबईकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातच प्रवेशासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे.
--
अशी आहेत नवीन महाविद्यालये
शहर जागा एकूण जागा
मुंबई ६ १४४०
ठाणे १३ ४६८०
रायगड १ 360
पालघर ४ १४४०
एकूण २४ ७९२०
--
मागील वर्षातील प्रवेशाचे चित्र
- ऑनलाईन प्रवेशासाठी ३ लाख ८९ हजार ६७५ जागा उपलब्ध होत्या.
- उपलब्ध २ लाख ६७ हजार ८६२ जागांवर म्हणजेच केवळ ६९ टक्के प्रवेश झाले.
- प्रवेश न झाल्याने तब्बल १ लाख २१ हजार ८१३ जाग रिक्त राहिल्या.
- २४२ महाविद्यालयांध्ये शून्य प्रवेश झाले.
- ३०६ महाविद्यालयांध्ये १०० टक्के प्रवेश झाले.
-३२० महाविद्यालयांध्ये २० टक्के, तर ४४३ मध्ये ५० टक्के प्रवेश झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com