मुंबईतील १७ मॉल्सला नोटिसा

मुंबईतील १७ मॉल्सला नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने २६ ते ३० मे या कालावधीत मुंबईतील ६८ मॉलची तपासणी केली होती. या मोहिमेत ४८ मॉल्समध्ये अग्निप्रतिबंधक व सुरक्षा उपाययोजनांची पूर्तता करण्यात आली आहे. तर, १७ ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याने नोटीस बजावली आहे.
मुंबई अग्निशमन दलाला महापालिका हद्दीतील मॉल्सची आकस्मिक तपासणीचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार विशेष पथकाने २६ ते ३० मे कालावधीत विविध ६८ मॉलची तपासणी केली. यावेळी ४८ मॉलमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची व सुरक्षेची पूर्तता करण्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तर १७ ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्र अग्निबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना २००६ अन्वये ३० दिवसांचा कालावधी देत कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
------------------------------
वीज, पाणी जोडणी खंडित
मालाड पश्चिम येथील ‘मेसर्स द मॉल’ या मॉलला आठवड्याभरापूर्वी त्रुटींची पूर्तता करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. त्याच मॉलमध्ये सोमवारी आगीची दुर्घटना घडली. याची गंभीर दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने ‘फायर ॲक्ट नोटीस’ रद्द करून मॉल ‘तत्काळ असुरक्षित’ घोषित केला आहे. तसेच अग्निशमन सुरक्षा यंत्रणांबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मॉलची वीज आणि पाणी जोडणी खंडित केली आहे.
--------------------------------
मालाड पोलिस ठाण्यामार्फत मॉल रिकामा करण्यात येत आहे. तसेच अभियोग दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- संतोष सावंत, अग्निशमन अधिकारी (प्रभारी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com