नीट युजी परीक्षा पुन्हा घ्‍यावी!

नीट युजी परीक्षा पुन्हा घ्‍यावी!

नीट युजी परीक्षा पुन्हा घ्‍यावी!
निकालावर संशय व्यक्‍त करत पालकांची मागणी
मुंबई, ता. ६ : नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून जाहीर करण्यात आलेल्या नीट युजी-२०२४ या परीक्षेच्या निकालात अनेक प्रकारच्या त्रुटी आणि शंका उपस्थित केल्या आहेत. या परीक्षेत काही केंद्रांवर कॉपीची प्रकरणे झाली असून यात काही कोचिंग क्लासेसचाही सहभाग असल्याचा दावा करत देशभरातील विद्यार्थी-पालकांनी ही परीक्षाच नव्याने घेण्याची मागणी केली आहे, तर एनटीएने मात्र हे दावे फेटाळून लावले आहेत.
नीट युजी-२०२४ या परीक्षेचे आयोजन एनटीएमार्फत करण्यात आले होते, मात्र गुजरात, ओडिशा, बिहार आदी राज्यात या परीक्षेच्या दरम्यान अनेक प्रकारचे गैरप्रकार समोर आल्याने विद्यार्थी-पालकांनी या परीक्षेच्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार निकाल हा १४ जूनपर्यंत अपेक्षित होता, मात्र तो एनटीएने खूप लवकर जाहीर का केला, असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे. त्यासोबत या निकालात ६७ विद्यार्थ्यांना पूर्ण गुण कसे मिळाले, असा सवाल करत असा प्रकार पहिल्यांदाच झाला असल्याने सर्वकाही संशयास्पद असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.
दरम्यारन, बिहार पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे युनिटने या परीक्षेच्या पेपर लीकप्रकरणी १३ जणांना अटक केली. त्यानंतर, चाचणी एजन्सीने राजस्थानच्या परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. दुसरीकडे गुजरात आणि ओडिशामध्येही अनेक परीक्षा केंद्रावर अनियमितता आढळून आली.

गुजरातमध्ये तिघांवर कारवाई
गुजरातच्या गोध्रा जिल्ह्यात तीन जणांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये एका शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे. ज्याने प्रत्येक उमेदवाराकडून १० लाख रुपयांच्या बदल्यात नीट युजीच्या परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका सोडवण्यास मदत केली होती. एका परीक्षार्थीने शिक्षकाला आगाऊ दिलेले ७ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले असून त्याच्यावरही कारवाई सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com