मुंबईकरांचे आरोग्य अधिक सृदृढ

मुंबईकरांचे आरोग्य अधिक सृदृढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : घराजवळ मोफत आरोग्य सुविधा देणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची’ आत्तापर्यंत ५७ लाखांहून अधिक मुंबईकरांनी लाभ घेतला आहे. प्रस्तावित, २५० दवाखान्यांपैकी २३९ दवाखाने सध्या कार्यान्वित आहेत. तर उर्वरित ११ दवाखाने गरजेनुसार लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या दवाखान्यात डायग्नोस्टिक सेंटर्सच्या माध्यमातून एक्स-रे, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय तपासणीही होणार असल्याने मुंबईकरांचे आरोग्य अधिक सुदृढ होणार आहे.
मुंबईत ३३ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर, ८१ पोर्टा केबिन, १०८ उपलब्ध दवाखाने आणि १७ रेडी स्ट्रक्चरमधील दवाखाने आहेत.  ‘आपला दवाखान्यात’ ५६ लाख ४६ हजार ९९४ तर एक लाख ३६ हजार ७५७ लाभार्थ्यांनी पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरचा लाभ घेतला. दरम्यान, खासगी निदान केंद्रांमध्ये (डायग्नोस्टिक सेंटर) महापालिकेच्या दराने डायग्नोस्टिक टेस्ट (एक्स-रे, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, एमआरआय इ.) या सेवाही येत्या दोन महिन्यांत दिल्या जातील, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.
---------------------------------------
पॉलिक्लिनिक, डायग्नोस्टिक सेंटरमधील सुविधा
- दंतचिकित्सक, स्त्रीरोग, बालरोग, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोग आणि नेत्ररोग अशा विविध तज्ज्ञांमार्फत मोफत सल्ला
- आपला दवाखानाअंतर्गत फिजिओथेरेपी सेंटर कार्यरत
- मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार, रक्त चाचण्या
---------------------
‘या’ वेळेत मिळतात उपचार
- पोर्टा केबिन आणि रेडी स्ट्रक्चर १३ दवाखाने पहिल्या सत्रात सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू असतात. तर दुसऱ्या सत्रात ९८ दवाखाने दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत सुरू असतात.
- नियमित दवाखाने केवळ दुसऱ्या सत्रात म्हणजे दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असतात. मुंबईकरांच्या सेवेसाठी एकूण १०८ दवाखाने
--------------------------------------
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये काही दिवसांत ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ धोरण राबवण्यात येणार आहे. त्याचाही फायदा मुंबईकरांना होणार आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com