मुंबई विद्यापीठ देशात २० व्या स्थानी

मुंबई विद्यापीठ देशात २० व्या स्थानी

मुंबई, ता. ६ : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहर उमटली आहे. आशियातील यादीत मुंबई विद्यापीठाने ६७व्या क्रमांक तर राज्यातील पारंपरिक विद्यापीठांत द्वितीय स्थानी झेप घेतली आहे.
मुंबई विद्यापीठाची वर्ल्ड रँकिंगमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मोठी सुधारणा केली आहे. १००१-१२००च्या क्रमवारीच्या बँडमधून यावर्षी ७११-७२० बँडमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, विषयनिहाय क्रमवारीत मुंबई विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत १०१-१५० या बँडमध्ये प्रवेश केला आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करत एम्प्लॉयमेंट आऊटकममध्ये सर्वाधिक ८१.४ गुण प्राप्त केले आहेत. त्यापाठोपाठ सायटेशन पर फॅकल्टी वर्गवारीत ३०.९, एम्प्लॉयर रेप्युटेशन २८.८, इंटरनॅशनल रिसर्च नेटवर्क १८.३, ॲकेडमिक रेप्युटेशन ९.१, फॅकल्टी स्टूडेंट्स रेशो २.८ याबरोबरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि शाश्वततामध्येही उत्तम कामगिरी केली आहे.
-----------------------------------
व्यावसायिक, कौशल्याधारित अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार करत विविध व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू केले आहेत. देशपातळीवर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मुंबई विद्यापीठाची कामगिरी अतुलनीय आहे. गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात १०४ टक्क्यांनी पदवी आणि ११२ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरच्या जर्नल्समध्ये १५६ टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या १२ विभागांना अनेक राष्ट्रीयस्तरावरच्या कार्यक्रमात मान्यता मिळाली आहे.
----------------------------
कोट
विद्यापीठातील सर्व घटकांनी संशोधन आणि विकासाच्या प्रक्रियेत केलेल्या विशेष आणि शाश्वत प्रयत्नांचा ही निष्पत्ती आहे. या निकालांचे समाधान असून भविष्यात रँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील.
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com