चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेसाठी मुदतवाढ

चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेसाठी मुदतवाढ

मुंबई, ता. ६ : ५८, ५९ आणि ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जूनपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील. त्यामुळे निर्मात्यांनी अनुक्रमे सन २०२०, २०२१ आणि २०२२ या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हा मानाचा पुरस्कार आहे. राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ६५ येथील जनसंपर्क विभागात कार्यालयीन वेळेत प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्याचबरोबर www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावरदेखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. निर्मात्यांनी परिपूर्ण अर्ज भरून महामंडळाकडे विहित मुदतीत प्रवेशिका सादर करायच्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com