सात ठिकाणी नोंदवलेल्या गुन्ह्यांना आक्षेप

सात ठिकाणी नोंदवलेल्या गुन्ह्यांना आक्षेप

सात ठिकाणी नोंदवलेल्या गुन्ह्यांना आक्षेप
जितेंद्र आव्हाड यांची उच्च न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : प्रभू रामचंद्रांबद्दल शिर्डीत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील सात ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व गुन्हे एकत्र करून त्याचा तपास ठाण्यातील वर्तकनगर किंवा नवघर पोलिस ठाण्यात वर्ग करावा, तसेच निष्पक्ष, कायद्याला धरून तपास करण्याचे न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी मागणी करत आव्हाड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथे ३ व ४ जानेवारी रोजी पक्षाच्या शिबिरात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी या राष्ट्रीय नेत्यांची उदाहरणे देतानाच प्रभू रामचंद्रांबाबत विधान केले होते. त्यावर आक्षेप घेत त्यांच्याविरोधात सात पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले; मात्र या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा करत आव्हाड यांनी ॲड. विनोद उत्तेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज (ता. १०) न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी पोलिस महासंचालकांकडून माहिती घेण्यासाठी खंडपीठाकडे वेळ मागितला. त्यानुसार सरकारला वेळ देत न्यायालयाने सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com