बीएमएसचे सर्व प्रवेश विद्यापीठ स्तरावरचे हवेत

बीएमएसचे सर्व प्रवेश विद्यापीठ स्तरावरचे हवेत

बीएमएसचे सर्व प्रवेश विद्यापीठ स्तरावरचे हवेत
विद्यार्थी संघटनांची मागणी

मुंबई, ता. ११ : राज्य सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या अनेक सीईटीच्या परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत. त्यात सीईटी सेलकडून विविध परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखाही जाहीर करण्यात आल्या होत्या; मात्र त्यानंतरही निकाल जाहीर केला जात नसल्याने मुंबई विद्यापीठातील बारावीनंतर बीएमएस (बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) असलेल्या आता बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज या नाव झालेल्या अभ्यासक्रमाचे सर्व प्रवेश हे विद्यापीठ स्तरावर सुरू करावेत, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.
मुंबई विद्यापीठातील बीएमएसच्या प्रवेशासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी एआयसीटीईचे संचालक प्रा. टी. जी. सीताराम यांना पत्र लिहिले असून बीएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. बीएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या गोंधळाबाबत युवासेनेनेही मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात यंदापासून सुरू होणाऱ्या बीएमएस या अभ्यासक्रमाच्या नावात बदल करून बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज असे करण्यात आले असून त्यामुळे सीईटीसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात मुंबई विद्यापीठातील बीएमएस या अभ्यासक्रमासाठी संबंधित महाविद्यालयांना ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (एआयसीटीई) मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. एआयसीटीईच्या परवानगीने बीएमएस अभ्यासक्रम राबविला जाणार आहे; मात्र असे असताना बीएमएसच्या प्रवेशासाठी यंदा सीईटी परीक्षा घेण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
..
वर्ष वाया जाण्याची भीती
बीएमएस आणि नावात बदल करण्यात आलेल्या बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज हे दोन्ही अभ्यासक्रम एकसमान आहेत; पण त्यासाठीची प्रवेशप्रक्रिया वेगवेगळी आहे. ती विद्यापीठ स्तरावर होणे आवश्यक असताना त्यासाठी सीईटी घेण्यात आल्याने अनेकांना त्याची वेळेत माहितीच मिळाली नाही. असंख्य विद्यार्थी या सीईटीलाही मुकले असल्याने यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती काही विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com