‘बेस्ट’ चे २३ बस मार्ग बदलले

‘बेस्ट’ चे २३ बस मार्ग बदलले

Published on

‘बेस्ट’चे २३ बसमार्ग बदलले
सायन रेल्वेपूल बंद झाल्यामुळे परिणाम; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ११० वर्षे जुना सायन रेल्वे पूल पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल बंद झाल्यामुळे त्यावरून जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त बेस्टच्या बसेसही वळवण्यात आल्या आहेत. सुमारे २३ बेस्ट बस मार्गांवर परिणाम झाला असल्याचे बेस्ट प्रशासनने स्पष्ट केले आहे.
या पुलावरून २३ मार्गांवर बेस्टच्या बसेस जातात. सध्या या मार्गावरून १० ते १२ हजार बस प्रवासी प्रवास करतात. सायन डेपो, प्रतीक्षानगर डेपो, अँटाप हिल डेपो येथून वांद्रे आणि कुर्ल्याकडे जाणाऱ्या बसगाड्या या मार्गावर धावतात. या सर्व बसना फटका बसला आहे; तर चुनाभट्टी डेपोतून धावणाऱ्या काही बस बंद कराव्या लागणार आहेत.

चुनाभट्टी बीकेसी कनेक्टर येथे
बस वळवल्या
ए ३५७ शिवाजीनगर ते वांद्रे पश्चिम, ए ३७६ शिवाजीनगर ते माहीम, ए ३५५ ट्रॉम्बे ते सांताक्रूझ, ए ३५६ वाशी नाका ते सांताक्रूझ, सी ५०४ सीबीडी बेलापूर ते वांद्रे पश्चिम.

धारावी डेपोपासून सायन हॉस्पिटलच्या दिशेने
बस क्रमांक ७ विक्रोळी ते भेंडी बाजार, ११ नेव्हीनगर कुलाबा ते वांद्रे पश्चिम, २२ मरोळ मरोशी ते भेंडी बाजार, २५ बॅकबे ते कुर्ला डेपो, १८१ अँटॉप हिल ते सिप्झ, २५५ प्रतीक्षानगर ते जेव्हीपीडी, ३१२ प्रतीक्षानगर ते गोशाळेपर्यंत अँटॉप हिल, ३४८ प्रतीक्षानगर ते दिंडोशी, ४११ गोवंडी ते वडाळा डेपो.

धारावीत संपणारा मार्ग
सायन डेपो ते भाईंदर ए ७२, सायन धारावी रिंगरूट ते १७६, सायन डेपो ते वीर कोतवाल उद्यान दादरपर्यंत ४६३, धारावी डेपो ते ट्रॉम्बे केवल सायन डेपोपर्यंत ३५२, बॅकबे ते धारावी ते सायन डेपोपर्यंत ३०५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.