पाणी पुरवठ्यातील दुजाभावाने संताप

पाणी पुरवठ्यातील दुजाभावाने संताप

मुंबई ः दक्षिण मुंबईत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. या इमारतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होतो. मात्र, चाळींमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. अलीकडच्या काळात भायखळ्यातील टोलेजंग इमारतींमधील घरांना सुरळीत तथा योग्य दाबाने पाणीपुरवठा होतो; परंतु म्हाडा इमारती, बैठ्या चाळींना पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याचा आरोप रहिवासी मंडळांकडून होत आहे. त्यामुळे रस्त्यावर सुशोभीकरणासाठी १,७०० कोटी रुपये खर्च करण्याऱ्या पालिका प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल, असा इशारा मंदार निकेतन रहिवासी मंडळाचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com