७/११ बॉम्बस्फोट खटल्याला अखेर मुहूर्त

७/११ बॉम्बस्फोट खटल्याला अखेर मुहूर्त

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई लोकलमधील ७/११ बॉम्बस्फोट प्रकरणाच्या खटल्याला अखेर मुहूर्त सापडला आहे. दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर अपील व त्यांच्या अर्जांवर लवकरच सुनावणी सुरू होणार असून याबाबत न्यायालय आठवडाभरात निर्णय घेणार आहे.
११ जुलै २००६ रोजी, चर्चगेट आणि बोरिवलीदरम्यान विविध स्थानकांत लोकल ट्रेनमध्ये संध्याकाळी ६.२० नंतर एकामागोमाग एक बॉम्बस्फोट झाले. या दुर्घटनेत १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ८२४ लोक जखमी झाले. आठ वर्षांहून अधिक काळ चाललेल्या खटल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कार्यरत असलेल्या विशेष न्यायालयाने (मकोका) एहतेशम सिद्दीकी, आसिफ खान, फैसल शेख, नावेद खान आणि कमाल अन्सारी या दोषींना फाशीची शिक्षा व इतर सात जणांसाठी ऑक्टोबर २०१५ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोषींपैकी एहतेशम सिद्दीकी या आरोपीने दाखल केलेल्या अर्जावर आज (ता. २) न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी आरोपींच्या अपीलांवर सुनावणी झालेली नसल्याने २००५ पासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या युक्तिवादानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील नियमित सुनावणीबाबत आठवडाभरात निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले व सुनावणी तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.