आयटीआयची आज 
प्राथमिक गुणवत्ता यादी

आयटीआयची आज प्राथमिक गुणवत्ता यादी

आयटीआयची आज
प्राथमिक गुणवत्ता यादी
दोन लाख ३५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज
मुंबई, ता. ३ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये विविध प्रकारच्या ट्रेडच्या प्रवेशांची प्राथमिक गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. ४) जाहीर केली जाणार आहे. या वेळी आयटीआयच्या प्रवेशासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने प्राथमिक गुणवत्ता यादीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

राज्यातील शासकीयच्या ४१८ आणि खासगीच्या ६०८ आयटीआयमध्ये एकूण एक लाख ४८ हजार ५६८ जागा उपलब्ध आहेत. यासाठी ३ जूनपासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. या प्रवेश नोंदणीला यंदाही प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपली पसंती दर्शवली आहे. आजपर्यंत दोन लाख ३५ हजार ४८० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी दोन लाख ३३ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या विविध ट्रेडच्या प्रवेशाचे शुल्कही भरले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी ही गुरुवारी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार असून या हरकतींचे समाधान झाल्यानंतर १४ जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com