अबू सालेमच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाचा नकार

अबू सालेमच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास खंडपीठाचा नकार

Published on

अबू सालेमच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेम याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसऱ्या तुरुंगात आपल्या जीवाला धोका असून आपल्याला तळोजा कारागृहातून हलवण्यात येऊ नये, ही मागणी सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर सालेम याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले; मात्र न्या. अजय गडकरी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्यावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे सालेम याला दुसऱ्या खंडपीठाकडे जावे लागणार आहे.
मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेमला दोषी ठरवण्यात आले असून न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सालेम सध्या नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहातील टोळी संघर्षावरून जीवाची भीती असल्याच्या कारणास्तव अबू सालेम याने मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्यात येऊ नये, अशी मागणी सालेम याने केली होती, मात्र अबू सालेम याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळून होती. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने बुधवारी (ता. ३) त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.