ड्रेसकोडविरोधात छात्रभारतीचे निवेदन

ड्रेसकोडविरोधात छात्रभारतीचे निवेदन

मुंबई ः चेंबूर येथील एन.जी. आचार्य महाविद्यालयाने सुरू केलेल्या ड्रेसकोड सक्तीविरोधात ‘छात्रभारती’ या विद्यार्थी संघटनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, जीन्स आणि टी-शर्टमध्ये असभ्य असे काय आहे, असा सवाल करत बंदीला विरोध दर्शविला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासूनच महाविद्यालयाने नवीन ड्रेसकोड लागू केला आहे. यात विद्यार्थ्यांना कोणत्याही रंगांचे शर्ट-पँट, मुलींसाठी कुर्ता-पायजमा असा ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. तर जीन्स, अर्धवट कपडे, त्यासोबत इतर धर्मियांच्या मुलींच्या हिजाब, निकाब, बुरखा यावरही बंदी घालण्यात आली असून महाविद्यालय प्रशासनकडून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष विकास पटेकर यांनी विद्यार्थ्यांनी कोणते कपडे घालावेत, हे ठरवण्याचा अधिकार महाविद्यालय प्रशासनाला नसून मनमानी निर्णय घेणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com