आमदार नियुक्तीचा गुंता कायम

आमदार नियुक्तीचा गुंता कायम

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा गुंता कायम आहे. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या नावांची यादी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नसल्याने आता १८ जुलैला सुनावणी होणार आहे.
विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेत सरकारने खो घातल्याचा दावा करीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दुर्लक्षामुळे ही नियुक्ती रखडली असून राज्यपालांची ही भूमिका कायद्याला धरून नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी (ता. ४) सुनावणी होणार होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.