झोपडपट्टी भागांची दुर्गंधीमुक्ती

झोपडपट्टी भागांची दुर्गंधीमुक्ती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः झोपडपट्टी भागात सुविधा नसल्यामुळे मलमूत्रयुक्त सांडपाणी थेट नदी-नाल्यांमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीने रोगराईत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका झोपडपट्टी भागात मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे विस्तारणार आहे.
झोपडपट्ट्यांमधील बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा एप्रिल, २०२४ मध्ये अभ्यास केला असता ही समस्या प्रकर्षणाने निदर्शनास आली होती. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडे याबाबत खुलासा मागण्यात आला. शहरातील मूलभूत सुविधा वाढवण्यावर भर देताना महापालिकेने मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे विस्तारण्यासह मजबुतीकरणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने महापालिका क्षेत्रामधील सर्व प्रमुख नाल्यांमध्ये येणारा बिनपावसाळी पाण्याचा मलप्रवाह अडविणे व जवळच्या अस्तित्वात असलेल्या मलनिःसारण वाहिनीला वळविण्याच्या कामासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. या सल्लागारांमार्फत स्थळदर्शक अहवाल व निरीक्षण अहवाल मंजूर झाला असून मसुदा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com