संक्रमित रक्त पुरवठ्याचा धोका होणार कमी

संक्रमित रक्त पुरवठ्याचा धोका होणार कमी

Published on

संक्रमित रक्तपुरवठ्याचा धोका होणार कमी
- तीन संस्थांकडून रक्तपेढ्यांचा आढावा; कामकाजाची वर्षातून तीनदा चाचणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईसह देशातील सर्व रक्तपेढ्यांमधून संक्रमित रक्तपुरवठा होण्याचा धोका आता कमी होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे कमी करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. या अंतर्गत बाह्य गुणवत्ता हमी सेवा योजना लागू करण्यासाठी, आरोग्य सेवा संचालनालयाने तीन बाह्य गुणवत्ता हमी सेवा (ईक्यूएएस) चाचणी संस्थांसोबत करार केला आहे. या करारामुळे सर्व रक्तपेढ्यांच्या कामाच्या दर्जाचा दरवर्षी आढावा घेतला जाणार आहे.
रक्तपेढ्यांमधून संसर्गजन्य रक्ताचा पुरवठा होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याला सामोरे जाण्यासाठी केंद्रीय आरोग्य सेवा संचालनालयाने सर्व रक्तपेढ्यांसाठी बाह्य गुणवत्ता हमी सेवा योजना अनिवार्य केली आहे. याअंतर्गत आता तीन सेवा पुरवठादार संस्था आपापल्या राज्यातील रक्तपेढ्यांच्या कामाच्या गुणवत्तेचा वर्षातून तीन वेळा आढावा घेतील.

अशी होणार समीक्षा
या समीक्षेसाठी करारावर स्वाक्षरी केलेल्या तीन संस्था त्यांच्या राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना वर्षातून तीन वेळा एचआयव्ही, हिपॅटायटीस, रक्तगट क्रॉस मॅचिंग, अनियमित अँटीबॉडीज आणि न्यूक्लिक ॲसिड तपासण्यासाठी रक्ताचे नमुने पाठवतील. पाठवलेल्या रक्ताचे कोणते नमुने संक्रमित आहेत, हे या संस्थांना आधीच कळणार असले तरी, रक्तपेढ्यांची तपासणी करण्यासाठी ते याबाबत अनभिज्ञ राहणार आहेत. यानंतर या संस्था रक्तपेढ्यांकडून येणारे अहवाल त्यांच्या स्वत:च्या अहवालांशी जुळवून घेतील. रक्तपेढ्यांचे अहवाल संस्थेच्या अहवालाशी जुळल्यास संबंधित रक्तपेढीच्या कामाच्या दर्जात कोणतीही घट होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.