हवामान विभागाचे वरातीमागून घोडे

हवामान विभागाचे वरातीमागून घोडे

Published on

हवामान विभागाचे वरातीमागून घोडे
अंदाज चुकला; घाईघाईत रेड अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईत आज मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी तुंबले. वाहतूक सेवा कोलमडली, मात्र यामध्ये हवामान विभागाचा अंदाज वर्तवणाऱ्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राला या मुसळधार पावसाचा अंदाज आला नव्हता. त्यांनी सोमवारसाठी यलो अलर्ट जारी केला होता. त्यामुळे त्यांचा अंदाज फोल ठरल्याचे दिसले.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने मुंबईत सोमवारी काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवला होता; तर गुरुवारपर्यंत हलका पाऊस असेल असे सांगत ‘ग्रीन अलर्ट’ जारी केला होता. यामुळे मुंबईकर ही आजच्या मुसळधारेबाबत अनभिज्ञ होते. मात्र रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने केवळ ६ तासांत ३०० मि.मीची नोंद केली. त्यानंतर घाईघाईत हवामान विभागाने सोमवार (ता. ८) दुपार नंतर रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला; तर मंगळवारसाठी काही ठिकाणी मुसळधार सरींच्या अंदाजासह यलो अलर्ट आणि बुधवारसाठी हलक्या सरींसह ग्रीन अलर्ट जारी केला आहे. एकंदरीत हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज दिसत आहे. आता हा तरी अंदाज अचूक येतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
.......
मंगळवारीही काही भागांत मुसळधार
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने मुंबईत मंगळवारी (ता. ९) काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बुधवारी हलक्या सरींसह ग्रीन, तर पुढील दोन दिवस म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी पुन्हा यलो अलर्ट जारी केला आहे.
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.