आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Published on

आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई, ता. ८ : मुंबई अणि परिसरात अतिवृष्टीमुळे सोमवारी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली; तर मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील पहिल्या सत्रातील सकाळी ११ ते २ या वेळातील नियमित परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात आले. पुढे ढकलण्यात आलेल्या पेपरची परीक्षा १३ जुलै रोजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. पावासामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुंबई महानगरातील सर्व महापालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना, तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे; तर काही व्यावसायिक आणि इतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या असल्यास त्याचा आढावा घेऊन तशी सवलत विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.