लॉरेंस बिष्णोईसह नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र

लॉरेंस बिष्णोईसह नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र

Published on

लॉरेंस बिष्णोईसह नऊ जणांविरुद्ध आरोपपत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज विशेष मोक्का न्यायालयात १७३५ पानांचे आरोपपत्र दाखल केले. सहा अटक आरोपी, तसेच तुरुंगात कैद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईसह तीन वाँटेड आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

१४ एप्रिल रोजी पहाटे सलमान खानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी सलमानच्या घराच्या दिशेने बंदुकीतून चार गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी तपास करीत असलेल्या गुन्हे शाखेने तीन महिन्यांत १,७३५ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये भक्कम पुरावे म्हणून विविध कागदपत्रे जोडली असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुराव्यांमध्ये ४६ साक्षीदारांचे जबाब तसेच फौजदारी दंड संहितेच्या कलम १६४ अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे. त्याचबरोबर मोक्का कायद्यांतर्गत कबुलीजबाब, २२ पंचनामे आणि तांत्रिक पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.