मुंबईत लख्ख ऊन

मुंबईत लख्ख ऊन

Published on

मुंबईत लख्ख ऊन


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईतील पावसाचा जोर ओसरला आहे. बुधवारी तर लख्ख ऊन पडल्याचे दिसले. हवामान खात्याने बुधवारसाठी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवला होता. हवामान विभागाने रविवारपर्यंत काही भागात मुसळधार; तर काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत आज पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. सांताक्रूझ येथे १.६ मिमी, कुलाबा येथे ७.२ मिमी पावसाची नोंद झाली. दुपारच्या वेळी ऊन पडल्याने कमाल तापमान काहीसे वाढले असून ते अनुक्रमे ३० आणि ३१.८ अंश सेल्सिअस इतके होते. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि अधून-मधून मध्यम पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२ अंश सेल्सिअस आणि २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.