कौशल्य केंद्रामार्फत ७०० जणांना नोकऱ्या

कौशल्य केंद्रामार्फत ७०० जणांना नोकऱ्या
Published on: 

कौशल्य केंद्रामार्फत ७०० जणांना नोकऱ्या
-वर्षभरात एक लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः कौशल्य विकास केंद्रामार्फत आयोजित रोजगार मेळाव्यात सहा तासांत ७०० जणांना लोकऱ्या मिळाल्या. कौशल्य मिळवण्याचा तरुणांचा कल पाहता राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि महानगरपालिका हे एकत्र येऊन कांदिवली येथे एक अत्याधुनिक कौशल्य केंद्र सुरू करणार आहेत. या माध्यमातून पुढील एका वर्षात किमान एक लाख नोकऱ्यांची संधी उपलब्‍ध करून देण्याचे उद्दिष्‍ट ठेवण्यात आले आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील एनएसडीसी आणि महापालिकेने यासंदर्भातील एका सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी केली. मुंबईतील कर्मचाऱ्यांना कौशल्ये सहजगत्या उपलब्ध होण्यासाठी, तसेच त्यातील नवनवीन बदल आत्मसात करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. उद्योग, रोजगाराशी संबंधित प्रशिक्षण आणि प्लेसमेंटची सुविधा देऊन हे केंद्र शिक्षण आणि रोजगार यांच्यातील अंतर कमी करेल. उपेक्षित समुदाय मागे राहणार नाही, यासाठी केंद्र प्रयत्नशील राहील, असे याबाबत सांगण्यात आले.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ कार्यकारी उपाध्यक्ष अजय कुमार रैना म्‍हणाले, कुशल कामगारांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तरुणांचा सर्वसमावेशक विकास करत त्यांना आजच्या स्पर्धात्मक वातावरणात तग धरून राहण्यासाठी सक्षम करणे, हे या केंद्राचे ध्येय आहे.


पाच विशेष अभ्‍यासक्रम
पालिका आणि एनएसडीसी यांच्या सहकार्याने आकुर्ली गाव, कांदिवली पूर्वेत सर्वसमावेशक व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थापन केली आहे. ३४४०.६८ चौ.मी.च्या बिल्ट-अप क्षेत्रासह तळमजला अधिक पाचमजली इमारत आहे. या केंद्रात पाच विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, तीन ते सहा महिन्यांच्या अल्पकालीन अभ्यासक्रमांचा समावेश आहे. फॅशन, तंत्रज्ञान, एसी आणि रेफ्रिजरेशन, गेमिंग-ॲनिमेशन, रेस्टॉरंट, डेटा आणि सायबर सिक्युरिटी यासारख्या सध्या आवश्यक असलेल्या उद्योगाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. कर्मचाऱ्यांच्या गरजांनुसार कोर्स ऑफर आणखी वाढवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.