तिकीट घराची तोडफोड करणारे दोघे अटकेत

तिकीट घराची तोडफोड करणारे दोघे अटकेत
Published on

तिकीट घराची तोडफोड करणारे दोघे अटकेत

मुंबई, ता. २२ ः रेल्वे पोलिसांनी कारवाई केल्याचा राग मनात धरत दोन तरुणांनी सोमवारी (ता. २१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास टिळकनगर रेल्वे स्थानकातील तिकीट घराची तोडफोड केली. समशेर खान आणि आकाश सिंग, अशी त्यांची नावे आहेत. नेहरूनगर पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा नोंदवत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक आरोपी आणि त्यांचे अन्य दोन साथीदार तिकीट घराजवळून रेल्वे रुळांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पत्रा उचकटत असताना राज्य रेल्वे पोलिसांनी आकाश यास पकडले. अन्य साथीदार पळून गेले. त्या कारवाईचा राग मनात धरून आकाश, समशेर यांनी फलाट क्रमांक एकवरील तिकीट घराच्या काचा, एटीव्हीएम यंत्र, तिकीट घरातील संगणक आणि अन्य यांत्रिक साहित्याची तोडफोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com