समलैंगिक संबंधादरम्यान मृत्यू

समलैंगिक संबंधादरम्यान मृत्यू
Published on

समलिंगी संबंधादरम्यान मृत्यू
घटनेनंतर पसार झालेल्या तरुणावर गुन्हा
मुंबई, ता. १८ ः समलिंगी संबंधादरम्यान बेशुद्ध पडलेल्या पार्टनरला वैद्यकीय मदत न पुरविता पसार झालेल्या तरुणाविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवला. १४ फेब्रुवारीला काळबादेवी परिसरात अजय कपाडिया (वय ५५) आणि अमित दिवेकर (वय ३४) यांच्यात समलिंगी संबंध सुरू होते. त्यादरम्यान कपाडिया बेशुद्ध पडले; मात्र अमितने त्यांना वैद्यकीय मदत न पुरविता तेथून पळ काढला. तसेच त्याने कपाडिया यांचे दोन मोबाईलही चोरले. दरम्यान, बेशुद्ध पडलेल्या कपाडिया यांचा मृत्यू झाला. याबाबत जी. टी. रुग्णालयातून पोलिसांना सूचना मिळाली. पोलिसांनी प्रथम अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी सुरू केली. अमितने वेळीच डॉक्टर बोलावले असते किंवा कपाडिया यांना रुग्णालयात दाखल केले असते, तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com