महामुंबईत तापमानात चिंताजनक तफावत

महामुंबईत तापमानात चिंताजनक तफावत
Published on

महामुंबईत तापमानात चिंताजनक तफावत

१३ अंशांचा फरक; रेस्पायर लिव्‍हिंग सायन्सेसच्या अभ्यासातून स्पष्‍ट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : महामुंबईच्या परिसरात उष्णतेचे निरनिराळे पट्टे निर्माण झाले असून, तेथील तापमानातील फरक चिंता वाढवणारा आहे. वसई पश्चिम आणि घाटकोपर यांसारख्या उपनगरांत सरासरी तापमान अनुक्रमे ३३.५ अंश आणि ३३.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर पवई शहरातील हिरवळीच्या परिसरात सरासरी २०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. काही भागांतील या तापमानात १३ अंश सेल्सिअसचा फरक आढळला आहे, असे रेस्पायर लिव्‍हिंग सायन्सेस या संस्थेच्या अभ्यासातून स्पष्‍ट झाले आहे.

१ मार्च ते २२ मार्च २०२५ या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांच्या आसपासच्या परिसरात रेस्पायर लिव्‍हिंग सायन्सेसने हे सर्वेक्षण केले. रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसच्या (यूएचआय) माध्यमातून लोकसंख्या अधिक असलेल्या शहरी क्षेत्रांतील आणि कमी विकसित किंवा हिरवळीच्या भागांतील तापमानातील महत्त्वपूर्ण फरक दर्शवते. काँक्रीटच्या इमारती आणि रस्ते, वनस्पतींचा अभाव आणि स्थानिक प्रदूषणाचे स्तर हे या तफावतीमागील मुख्य कारण असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसचे संस्थापक आणि सीईओ रोनक सुतारिया म्हणाले, की आम्ही मुंबईसारख्या शहरांत सूक्ष्म हवामान क्षेत्रांची निर्मिती होताना पाहत आहोत. हे तापमानातील फरक केवळ शैक्षणिक नाही तर ते रहिवाशांसाठी अधिक उष्ण ताण आणि संबंधित आरोग्य समस्या निर्माण करणारे आहेत.

मुंबईच्या दक्षिण टोकावर असलेले आणि समुद्री वाऱ्यांमुळे काहीसा थंड असलेल्या कुलाबा परिसरातही उष्णतेच्या झळा वाढल्याचे दिसत आहे. यामुळे थंड क्षेत्रेदेखील वाढत्या उष्णतेपासून सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रेस्पायर लिव्हिंग सायन्सेसने मे २०२४मध्ये केलेल्या सर्वेक्षणात बोरिवली पूर्वसारखे भाग वरळीच्या तुलनेत जवळपास १३ अंश सेल्सिअसने थंड होते.
----
तापमानातील चढ-उतार
मार्च २०२५मध्ये मुंबईने अनेक उष्णतेच्या लाटांचे अनुभव घेतले. भारतीय हवामान विभागाने महिन्याच्या पहिल्या सहामाहीत अधिकृत उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यांची घोषणा केली. जेव्हा तापमान जवळपास ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. पूर्व किनाऱ्यावरील गरम वाऱ्यांमुळे दिवसा तापमानात असामान्य वाढ झाली. ९ आणि १० मार्चला तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. १५ मार्चपासून पुन्हा तापमान वाढले आणि १८ मार्चसाठी २-४ अंश सेल्सिअस वाढीचा इशारा देण्यात आला होता.
........
पवई सर्वात थंड
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, वसई पश्चिम येथे सरासरी ३३.५ अंश सेल्सिअस तापमानासह यादीत अव्वल होते. त्यानंतर घाटकोपर ३३.३ अंश सेल्सिअस आणि कुलाबा (दक्षिण मुंबई) ३२.४ अंश सेल्सिअसवर होते. चेंबूर २५.५ अंश तापमान नोंदले गेले. याउलट पवई या तुलनेने हिरवळ असलेल्या आणि कमी बांधकाम झालेल्या भागाने २०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. त्यानंतर चकाला २३.४ आणि चेंबूर २५.५ अंश सेल्सिअस यांचा समावेश होता.
......
मार्च २०२५मधील सर्वात उष्ण ठिकाणे (अंश सेल्सिअस)
● वसई पश्‍चिम ३३.५
● घाटकोपर ३३.३
● कुलाबा (दक्षिण मुंबई) २३.४
● शिवाजीनगर ३०.८
● छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ३०.१

सर्वात थंड ठिकाणे :
● पवई २०.४
● चकाला (अंधेरी पूर्व) २२.४
● चेंबूर २५.५
.......
मुंबई विभागातील तापमान फरक (अंश सेल्सिअस)
● वसई वेस्ट आणि पवई : १३
● कुलाबा आणि चकाला : ९.०
● घाटकोपर आणि चेंबूर : ७.८
.....
मे २०२४ मधील सर्वाधिक उष्ण ठिकाणे (अंश सेल्सिअस)
● वरळी ३३.५
● पवई ३२.२
● वसई पिश्‍चिम ३०.५
● बीकेसी २९.६
● मालाड पश्‍चिम २९.३
..........
थंड ठिकाणे
● बोरिवली पूर्व २०
● कुलाबा २४.४
● शिवडी २५
● कांदिवली पश्चिम २५.४
● भायखळा २५.८
........
नोंदवलेला सर्वाधिक तापमान फरक : (अंश सेल्सिअस)
● वरळी आणि बोरिवली पूर्व : १३.५
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com