

एका कारला तासाभरात दहा चलान
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील घटना; परिवहन आयुक्तांकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी सात ते आठदरम्यान एकतर्फी प्रवास करताना एका वाहनचालकावर सीट बेल्ट न लावल्यामुळे एका तासात दहा चलान आकारून दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी मनसेने परिवहन आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस प्रदीप वाघमारे यांनी याबाबत सांगितले, की परिवहन विभाग सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दररोज लाखो जड-अवजड वाहने ओव्हरलोड वाहतूक करीत आहेत, अनधिकृत बॉडी बांधकाम केलेली वाहने रस्त्यांवर धावत आहेत, परिवहन विभागाला खोटी माहिती पुरवून ओडिसी मालाची वाहतूक करणारी वाहने धावत आहेत; परंतु या वाहनांवर कारवाई केली जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे; परंतु या सर्व गंभीर बाबींकडे परिवहन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून एका तासात एका वाहनावर दहा चलान आकारले गेले आहेत. ही अन्यायकारक चलान पूर्णतः रद्द करावीत.
भरधाव वेगात वाहन चालविणे वगळता इतर वाहतूक नियम उल्लंघनासाठी २४ तासांत एकच चलान आकारले जाते. जर कोणाला जास्त चलान आकारले असतील तर ते रद्द होतील.
- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.