

प्रभावशाली ३० ग्रंथांचा मराठीत अनुवाद
सोमय्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचा उपक्रम
मुंबई, ता. १० ः जगभरातील संशोधक, इतिहासकार, विविध विषयांतील तज्ज्ञांसह विद्यार्थ्यांवर प्रभाव निर्माण केलेल्या महत्त्वाच्या ३० ग्रंथांचा लवकरच मराठीत अनुवाद होणार आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वात मौल्यवान ग्रंथसंपदेची भर पडणार आहे. सोमय्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजने यासाठी पुढाकार घेतला असून, त्यानिमित्त ‘ज्ञानसेतू’ या उपक्रमाची घोषणा शुक्रवारी (ता. ११) सोमय्या विद्यापीठाच्या ॲरोबिंदो इमारतीत होणार आहे.
कार्यक्रमाला सोमय्या विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू समीर सोमय्या, प्र-कुलगुरू प्रो. व्ही. एन. राजशेखरन पिल्लई मार्गदर्शन करतील, तर सोमय्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचे संचालक डॉ. गणेश देवी उपक्रमांची माहिती देतील. ‘दी अनकॉन्सिअस’, ‘हिस्ट्री ॲज ए सिस्टीम’, ‘ऑर्कालॉजी ऑफ नॉलेज’, ‘दी डान्स ऑफ शिवा’, ‘दी इनर वर्ल्ड’, ‘दी लॉजिक ऑफ सायन्टिफिक डिस्कव्हरी’ आदी ३० ग्रंथांचा मराठीत अनुवाद केला जाणार आहे. यानिमित्त ‘ज्ञानसेतू’ या उपक्रमातच ‘वर्ल्ड सिव्हिलायझेशन’, ‘मुंबईचा इतिहास’ या उपक्रमांचीही घोषणा केली जाणार आहे. त्यातून ४० इतिहास संशोधकांचा समूह मुंबईची वेगळी ओळख जगापुढे आणणार आहेत. ‘वर्ल्ड सिव्हिलायझेशन’ उपक्रमात ब्रिटन, इटली, चीन, आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आदी देशांतील तज्ज्ञ नागरीकरणावर संशोधन करून १० खंड पुढील वर्षापर्यंत प्रसिद्ध करणार आहेत.
----
नव्या विद्याशाखांची घोषणा
‘ज्ञानसेतू’च्या तिसऱ्या उपक्रमात पीएचडीसाठी इतिहास आणि भाषा हे विषय नव्याने सुरू केले जातील, तर बीए, एमएसाठी लिबरल आर्ट ही नवी शाखा सुरू केली जाणार आहे. तसेच ‘ट्रान्सएरिया’ या शोधनिबंधाच्या नियतकालिकाची सुरुवात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.