New India Bank Scam : न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी हितेश मेहतांसह १० आरोपींवर १२,६३४ पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबई : न्यू इंडिया बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी माजी व्यवस्थापक हितेश मेहता यांच्यासह १० आरोपींविरोधात १२,६३४ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यांच्यावर १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
आरोपपत्राद्वारे बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू, त्यांच्या पत्नी गौरी भानू यांना फरार आरोपी घोषित केले. त्यांच्याविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयाला दिली. त्याच्यासह मेहता, धर्मेश पौन, अभिमन्यू भोअन, उल्हनाथन अरुणाचलम, त्याचा मुलगा मनोहर, कपिल देढिया, जावेद आझम आणि राजीवरंजन पांडे या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केल्याचे सांगितले. बँकेचे ऑडिट करणाऱ्या अभिजित देशमुख, लक्ष्मीनारायण नायक, मेसर्स एस. आय. मोगल कंपनीचे सुभाष मोगल, अजय राठोड, पवन जैस्वाल आणि शौकत जामदार या व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
४५ कोटी परदेशात; ईडीचा दावा
प्रमुख आरोपी मेहता यांनी २०१९ पासून टप्प्याटप्याने बँकेच्या गोरेगाव आणि प्रभादेवी शाखेतील १२२ कोटींची रोकड परस्पर काढून अरुणाचलम, पौन यांच्यासह अन्य आरोपींना दिली. आरोपींनी ही रक्कम आपल्या व्यवसायांमध्ये गुंतवली. फेब्रुवारी महिन्यात हा घोटाळा उघड झाला. या घोटाळ्याचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) सुरू आहे. सुमारे ४५ कोटी रुपये भानू दाम्पत्याने परदेशात नेल्याचा दावा ईडीने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.