वाहतूक नियम मोडण्यात दुचाकीस्वारांची आघाडी

वाहतूक नियम मोडण्यात दुचाकीस्वारांची आघाडी
Published on

वाहतूक नियम मोडण्यात दुचाकीस्वारांची आघाडी 
मुंबई वाहतूक पोलिसांचा अहवाल; ३० लाख दुचाकीस्वारांना चलन 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २४ : भारत सरकार सुरुवातीपासूनच रस्ते सुरक्षेबाबत अनेक पावले उचलत आहे. आता सरकारने मोटार वाहन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नवीन दंड आणि शिक्षेची अंमलबजावणी केली आहे. एकीकडे दंडाची रक्कम वाढवली असली, तरी वाहनचालक सुधारताना दिसत नाहीत. ‘३० लाख दुचाकीस्वारांनी गेल्या वर्षी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे’, असे वाहतूक पोलिसांच्या जानेवारी ते डिसेंबर २०२४च्या अहवालातून समोर आले आहे. 
वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, त्याची शिस्त वाहनधारकांना लागावी; यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी वाहतूक विभागाची पथके कार्यरत असतात. वारंवार वाहनांची तपासणीही होते. मुंबईत वाहने वाढत असून, अपघातांची संख्याही वाढलेली आहे. अपघातात गंभीर, जखमी किंवा मृत्यूची संख्या अधिक आहे. त्यात दुचाकीस्वारांचे अपघात वाढले आहेत. अपघातांवर नियंत्रण आणणे, वाहनचालक आणि वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने  वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने  वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे. 

जानेवारी ते डिसेंबर २०२४ कारवाई 
एकूण चलनसंख्या ६७.८४ लाख 
एकूण चलन रक्कम ५५४.४८ कोटी 
भरलेली चलनसंख्या २१.६८ लाख 
भरलेली चलन रक्कम - १६३.९ कोटी 
बाकी चलन - ४६.१६ लाख 
बाकी चलन रक्कम - ३८२. ३८ कोटी 
===
सर्वाधिक चलन असेलेली वाहने 
दुचाकी - ३०.४३ लाख 
चारचाकी - १२.६७ लाख 
रिक्षा - ७.८८ लाख 
टेम्पो - ३.४८ लाख 
काळी पिवळी टॅक्सी - २.४८ लाख 
===
सर्वाधिक दंड असेलली वाहने 
दुचाकी - २३१.७९ कोटी 
चारचाकी - ७१.६२ कोटी
टेम्पो - ३०.८२ कोटी
ट्रेलर - २२.९५ कोटी  
डम्पर - ३.११ कोटी
===
 न भरलेली चलन रक्कम 
दुचाकी -१८२.६५ कोटी 
चारचाकी - ७४.०२ कोटी
रिक्षा २६.६१ कोटी    
टेम्पो - १७.८२ कोटी 
ट्रेलर - १४.५३ कोटी 
==
====
वाहतूक नियम हे वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी असतात. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा जीवावर बेतू शकते. 
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ 
======

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com