पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचा पानाशिवाय पुस्तके

पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्यांचा पानाशिवाय पुस्तके
Published on

पहिलीच्या विद्यार्थ्यांना वहीच्या पानांशिवाय पुस्तके
हिंदी विषयाच्या अनिवार्यतेसाठी सावध भूमिका; बालभारतीचे परिपत्रक

मुंबई, ता. २४ : राज्य शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके नव्याने येत असून, ही पुस्तके वहीच्या पानांशिवाय असल्याने या पुस्तकांचे ओझे कमी असणार आहे. ही सर्व पुस्तके बालभारतीकडून तयार होऊन त्याचे वितरण राज्यातील शाळा आणि खासगी वितरकांकडे केले जात असून, त्यांच्या अनेक प्रती बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. बालभारतीने याबाबत नुकतेच एक पत्रक काढले आहे.

पहिलीपासून हिंदी हा विषय अनिवार्य करण्याच्या विषयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन आठवड्यांपूर्वी सरकारची भूमिका जाहीर करीत हा विषय अनिवार्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर बालभारतीने काढलेल्या परिपत्रकात हिंदी या विषयासाठी सावध भूमिका घेण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता पहिलीसाठी ‘खेल खेल में सिखे हिंदी’ (मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी) या पाठ्यपुस्तकाबाबत सर्व संबंधितांना नंतर कळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावर काही मराठी भाषाप्रेमींनी आक्षेप घेतले आहेत. हिंदी हा विषय अनिवार्य आहे का, याबाबत कोणती स्पष्टता या पत्रात नसल्याने ती स्पष्टता जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

..
पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ (जून २०२५) हे इयत्ता २री, इयत्ता ३री, इयत्ता ४थी आणि इयत्ता ६वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, तसेच इयत्ता २री ते इयत्ता ८वीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय, मूल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत. याबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घेण्यात घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com