भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मत्स्य तंत्रज्ञान प्रदर्शन मुंबईत
पहिल्या आंतरराष्ट्रीय मत्स्य तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
मुंबई, ता. १० : आंतरराष्ट्रीय मत्स्य तंत्रज्ञान प्रदर्शन (आयएफटी एक्स्पो २०२५) भारतातील मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीसाठीचे पहिले समर्पित व्यासपीठ असून, १२-१३ जूनदरम्यान हे प्रदर्शन येथे आयोजित केले जाणार आहे. मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होईल. भारताचे मत्स्यव्यवसाय क्षेत्र ऐतिहासिक बदलातून जात असताना होणारे हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा आयोजकांना विश्वास आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात २,७०३ कोटी रुपयांच्या विक्रमी निधीवाटपासह नवीन निर्यातकेंद्रित धोरणे आणि पायाभूत सुविधा व शाश्वततेमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेतीला भारताच्या अर्थव्यवस्थेचे ‘सनराइज सेक्टर’ म्हणून ओळखले जात आहे. महाराष्ट्रातही मत्स्यव्यवसाय क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे. मंत्री नितेश राणे यांच्या मते, ‘महाराष्ट्रातील मच्छीमारांना शेतकरी दर्जा दिल्यास या क्षेत्राला चालना मिळेल आणि महाराष्ट्र सागरी मत्स्योत्पादन आणि अंतर्देशीय मत्स्यव्यवसायात आघाडीच्या राज्यांपैकी एक बनेल.
या प्रदर्शनात संपूर्ण परिसंस्थेला एकत्र आणले जाईल. त्यात मत्स्यव्यवसाय, सी-फूड प्रोसेसिंग, कोल्ड स्टोरेज, स्वच्छता, ऑटोमेशन, पॅकेजिंग, एआय, मानके आणि लॉजिस्टिक्स यांचा समावेश राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.